मूळव्याध (Piles) आणि होमिओपॅथिक उपचारपद्धती -
मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला / असलेले कोंब. हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात.
लक्षणे जाणवत असल्यास बहुतेक वेळा ती खालील स्वरूपाची असतात –
शौचानंतर रक्तस्त्राव – हे रक्त लालभडक रंगाचे असते.
गुदद्वाराजवळ खाज
गुदद्वाराजवळ बाहेर आलेला कोंब – हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा .
मुळव्याधीचे प्रकार -
उत्पत्ती स्थानानुसार प्रकार
उत्पत्ती स्थानानुसार म्हणजेच मुळव्याध नक्की कुठल्या ठिकाणी होते त्यानुसार तिचे २ प्रकार पडतात.
अंतर्ग़त मुळव्याध
बाह्य मुळव्याध
१) अंतर्ग़त मूळव्याध :- गुदद्वाराच्या आत होणाऱ्या मुळव्याधीला अंतर्ग़त मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधीमध्ये वेदना कमी प्रमाणात व रक्तस्राव जास्त प्रमाणात असतो.
२) बाह्यः मूळव्याध :- गुदद्वाराच्या बाहेरील भागात होणाऱ्या मुळव्याधीला बाह्यः मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधीमध्ये वेदना व रक्तस्राव अत्यल्प असतो. परंतु खाज जास्त प्रमाणात असते.
मूळव्याधाची लक्षणे -
शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना
शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे
गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे, आव पडणे.
गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.
पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.
अॅनिमिया- मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला अॅनिमिया असे म्हणतात.
भूक मंदावणे – शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधीचा त्रासही वाढतो.
रुग्णाचे वजन कमी होते.
मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.
कारणे -
मूळव्याधाची कारणे काय आहेत?
1. बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे
2. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे
3. गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते
4. प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
5. चुकिची आहार पद्धति- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन
6. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे
7.अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.
8.रक्तवाहिण्यांचे आजार
9.जीवनातील ताण -तणाव , राग, भीती, इत्यादी
आहार -
हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे तसेच पुरेशी रात्रीची झोप आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.
शौचाच्या वेळी खालील काळजी घ्यावी –
- शौच करताना ताण / ताण देऊ नका.
- शौच केल्यानंतर हलक्या हाताने स्वच्छ करा.
होमिओपॅथिक उपचारपद्धती -
आहारात बदल करून मूळव्याधीच्या त्रासात जर काही फरक पडत नसेल तर आपल्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. होमिओपॅथी ही नैसर्गिक उपचारपद्धती असून यामध्ये जवळपास ९००० हजार उपुयक्त औषधी आहेत, त्यासाठी हिस्टरी घेऊन आजाराचे कारण शोधल्या जाते व तुम्हाला आवश्यक असणारी योग्य औषधीचे सिलेक्शन करून तुमचा आजार बसविण्याचे प्रयत्न करण्यात येतो. आम्ही व्यक्तिंवर उपचार करतो, फक्त रोंगावर नाही. होमिओपॅथीक उपचार पद्धतीमुळे २२५ वर्षांमध्ये जगभरात भरपूर लोकांना मदत झालेली आहे .
उपचाराकरिता संपर्क -
Whatsapp - +91 9922940123, https://wa.me/message/HIONXBP6I3Q4A1,
Email id - mannclinic.homeo@gmail.com
You tube Channel - https://www.youtube.com/channel/UCJeS...
Bleeding Piles cured by Homeopathy | Dr Rahul & Dr. Yojana | Mann Clinic Homeopathy | Testimonial 10
Address- डॉ. राहुल अंबाडकर M.D. Homeopathy &
डॉ . योजना अंबाडकर (डागा) B.H.M.S.
मन क्लिनिक होमिओपॅथी,
Mann Clinic - Multispeciality Homeopathy
First floor, Mata Vaishnavi apartment no.1, Jatharpeth Rd, near Mukharjee bunglow, Raut Wadi, Chhoti Umari, Akola, Maharashtra 444005 +91 99229 40123
0 Comments